सुखी-जिवन आणि निर्णय

आपण जिवनात एकदाच येतो,  जिवन एकच आहे आणि त्यातच तुम्हाला प्रयोग/निर्णय करायचे आहेत आणि त्यातच जगायचे आहे. बऱ्याच वेळेस आपणास स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात.

तुम्ही जो ही निर्णय घ्याल त्याचा तुमच्या जिवनावर नक्कीच परिणाम पडतो आणि कधी कधी खुप प्रभाव पडतो तुम्ही एखादा निर्णय घ्याल त्यात चुका होण्याची शक्यता तर आहेच. कधी कधी निर्णय हे आपल्या कमतरतेमुळे अथवा निर्णय क्षमता कमी असल्यामुळे चुकत नाहीत तर ते आपल्याला मिळालेल्या सुचनेमुळे अथवा परिस्थितीच अशी असते की तुम्हाला तसा निर्णय घ्यावा लागतो.

                आपल्या जिवनात खुप काही निर्णय हे चुकीचे झालेले असतात. चुकीचा निर्णय आणि त्याचा आपल्या जिवनावर झालेला खोल प्रभाव, निराशा

                प्रश्न हा आहे की त्याच प्रभावा खाली जगायचे की पुन्हा प्रयोग करावा, परंतु दुसरा प्रयोग करत असतांना संभावना ही पण आहे की हा निर्णय सुध्दा चुकु शकतो. किती चुका करून जिवन चांगले होणार आहे याचा भरोसा नाही त्यात जिवनाचे कालचक्र तर खुप छोटेसे आहे. भुतकाळात जावून तर निर्णय सुधारू शकत नाहीत. म्हणून जसे आहे तसे स्वीकारणे आनंदाचे ठरते-

                जिवन हेच आहे की निर्णय घ्या आणि जगा, चुकीचे निर्णय तर होणारच आहेत नाहीतर शेवटी एकच गोष्ट उरलेली असेल ती म्हणजे अधुरापण/अपुर्णता की जिवन तसे नाही जसे की असायला पाहिजे होते, जसे मला जगायचे होते.

                जिवन कोणाचेच तसे नाही जसे त्याला असावे वाटते. आपली रचनाच अषी आहे की आपल्याला छोटया छोटया कमतरता/चुका हया खुप मोठया दिसायला लागतात. जे आपल्या जवळ आहे ते मातीमोल आणि जे दुसऱ्या जवळ आहे ते सोन.

                मिल गया वह मिटटी है

                खो गया वह सोना है

                प्रत्येकाच्या जिवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभाव असतो कोणाला हया गोष्टीचा अभवा आहे तर कोणाला त्या गोष्टीचा अभाव असतो. असा कोणताही मनुष्य नाही ज्याला कोणत्या गोष्टीचा अभाव नाही आणि जर असेल तर तो मनुष्य नाही एक वस्तू आहे कारण त्याने मनुष्य होणे शिकलेलेच नाही.

                म्हणून अपूर्णतेशी लढत लढत अपूर्णता कमी करण्याच्या प्रयोगालाच जिवन म्हणतात.

समजदार व्यक्ती या अपूर्णतेला/अधूरेपणाला काही काळा नंतर विसरून पुढे जगत राहतो.

अधूरा आहे पण खुष आहे.

कारण परिपुर्ण कोणी नसत मग मी पूर्ण कसा असेल.

Share this Post